Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

चैत्रपाडवा

  तसं पाहिलं तर पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या अनेक आवर्तनातील असाच एक क्षण! रात्रीच्या बहरलेल्या आकाशात चंद्राच्या विविध तारासमूहात भटकताना आढळलेला pattern आणि त्यावरून ठरलेला हा चैत्र महिना. आणि अशा pattern मध्ये धरलेला एक reference point म्हणजे हा पहिला दिवस चैत्राचा.   10, 9, 8, 7 असं म्हणत अचानक गुढी वर नेल्याचे कुठे ऐकिवात तरी नाही, किंवा times square, harbour bridge वर कधी नयनरम्य रोषणाईही केल्याचं पाहिलं नाही, सुर्यासारख्याच सहजतेने गुढी वर जाऊन सुर्यास्ताला खाली येते आणि हे नवीन वर्ष सुरु होते. नाही म्हणायला हल्ली जागोजागी भल्या मोठ्ठया रांगोळ्या आणि दिमाखदार शोभायात्रा निघतात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा म्हणत विविध रंगानी नाहून निघत पाडवा येतो.   रामाने दक्षिण दिग्विजय गाजवून परतल्यावर राज्याभिषेकाचाही हाच दिवस आणि सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा शौर्यधुरंधर राजपुत्र संभाजी राजांना अनंत छळ होऊन वीरमरण प्राप्त झाले तोही हाच दिवस!   चैत्र वणवा सुरु होऊन अगदी अंगाची लाही लाही होणार, डोंगर नद्या कोरडे होणार, पण अशा ऋतुचक्रालाही उत्सवांने साजऱ्या करणाऱ्या हिं...